मुंबई : मुंबई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने मुंबईवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या टीमने ३ विकेट्स गमावत गाठलं. दिल्लीच्या टीमकडून रॉयने ५३ बॉल्समध्ये ९१ रन्सची शानदार इनिंग खेळली. रिषभ पंतने २५ बॉल्समध्ये ४७ रन्स केले.


मुंबईच्या टीमने तुफानी बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये १९४ रन्स केले आणि दिल्लीसमोर विजयासाठी १९५ रन्सचं आव्हान दिलं होतं.


यापूर्वी झालेल्या दोन्ही मॅचेसमध्ये मुंबईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिसरी मॅच मुंबई जिंकून कमबॅक करेल असं वाटत होतं मात्र, या मॅचमध्येही मुंबईचा पराभव झाला.