नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठलीये. प्रदुषणामुळे १९ नोव्हेंबरला राजधानीत होणाऱ्या दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन ते सहा डिसेंबरदरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे या कसोटीपर्यंत दिल्लीतील हवामान सुधारेल अशी बीसीसीआय आशा करतेय. त्यामुळे सामन्याचे ठिकाण बदलण्याची गरज पडणार नाही. 


१६ नोव्हेंबरपासून सुरु होणार कसोटी मालिका


भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. पहिला कसोटी सामना कोलकातामध्ये रंगणार आहे. या दौऱ्यात 
भारत तीन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. 


सामन्यावर नाही होणार स्मॉगचा परिणाम


दिल्लीतील स्मॉगचा परिणाम सामन्यावर होणार का असे विचारले असता सी के खन्ना म्हणाले, पुढील काही आठवड्यात येथील वातावरण ठीक होण्याची आशा आहे. सरकारी एजन्सी तसेच हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवलाय. दरम्यान, सध्या तरी सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाहीये. 


हे आहे पूर्ण वेळापत्रक


कसोटी मालिका


पहिली कसोटी- १६ नोव्हेंबर-  कोलकाता


दुसरी कसोटी - २४ नोव्हेंबर - नागपूर


तिसरी कसोटी - २ डिसेंबर - दिल्ली 



वनडे मालिका


पहली वनडे- १० डिसेंबर धरमशाला


दुसरी वनडे- १३ डिसेंबर- मोहाली


तिसरी वनडे- १७ डिसेंबर- विशाखापट्टणम



टी- 20 मालिका


पहली टी२०- २० डिसेंबर-कटक


दुसरी टी२० - २२ डिसेंबर- इंदूर


तिसरी टी२० - २४ डिसेंबर - मुंबई