PV Sindhu News: भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोनवेळा ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू हिला डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेत (Denmakr Open 2023) सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनच्या कट्टार प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या कॅरोलिना मारिनने (Carolina Marin) सिंधूवर मात केली. एक तास 13 मिनिटं चाललेल्या या सामन्यात कॅरोलिनाने सिंधुचा  18-21, 21-19, 7-21 असा पराभव केला. पण हा सामना गाजला तो सिंधू (PV Sindhu) आणि कॅरोलिनामध्ये झालेल्या भांडणामुळे. भर सामन्यातच या दोघी एकमेकिंना भिडल्या. याची गंभीर दखल धेत संघटनेने दोघींनाही यलो कार्ड दाखवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधू-कॅरोलिना भिडल्या
पीव्ही सिंधूने क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या सुपानिडा काटेथोंगचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली. याआधी गेल्याच आठवडयात झालेल्या फिनलँडच्या आर्कटिक ओपन सुपर 500 बँडमिंटन स्पर्धेत (Finland Arctic Open) सिंधूने सेमीफायनल गाठली होती.पण फायनलमध्ये जाऊ शकली नाही. आता डेनमार्क ओपन सुपर 750 स्पर्धेत सिंधूला क्वार्टर फायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागला. कॅरोलिना मारिनने तब्बल पाच वेळा सिंधूचा पराभव केला. कॅरोलिनाने 2016 रिओ ऑलिम्पिक आणि 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही सिंधूचा पराभव केला होता. 


सिंधू आणि कॅरोलिना यांनी अनेकवेळा एकमेकिंच्य खेळाचं कौतुक केलं आहे. पण शनिवारी वेगळंच चित्र पाहिला मिळालं. सिंधू आणि कॅरोलिना भर सामन्यात एकमेकिंना भिडल्या. पंचांनी दोन्ही खेळाडूंना अनेकवेळा इशारा दिला. शेवटी दोघींनाही यलो कार्ड दाखवण्यात आलं. पॉईंट घेतल्यानंतर कॅरोलिना आक्रमक होत जल्लोष करत होती, तसंच अपशब्द वापरत सिंधूला डिवचण्याचा प्रयत्न करत होती. पंचांनी तिला अनेकवेळा असं न करण्याच्या सूचना दिल्या. पण यानंतर कॅरोलिनाच्या वागणुकीत काही बदल होत नव्हता. तर सर्व्हिसला उशीर लावत असल्याने पंचांनी सिंधून दोन वेळा वॉर्निंग दिली. पहिला सेट 18-21 असा जिंकल्यानेतर कॅरोलिनाने जोरजोराद ओरडत जल्लोष केला. 



सिंधुने दुसरा सेट 21-19 असा जिंकत सामन्यात कमबॅक केला. यावेळई सर्व्हिस उशीरा करत असल्याने पंचांनी तिला सूचना केल्या. यावर सिंधूने पंचांनाच सुनावलं. कॅरोलिनाला जोरजोरात ओरडण्याची परवानगी दिली आहे का? आधी तिला सांगा मग मी सर्व्हिस लवकर करेन असं सिंधूने उत्तर दिलं. 


यानंतर एका पॉईंटला शटल सिंधूच्या कोर्टमध्ये पडलं आणि यावरुन दोघींमध्या वादाची ठिणगी पडली. दोघीही अक्षरशा भांडू लागल्या. यावेळी पंचांनी मध्यस्थी करत भांडण मिटवलं, पण यानंतर दोघींवरही कारवाई करण्यात आली.