Shoaib Malik: विवाहित असूनही 3 वर्षांपासून सुरु होतं शोएबचं अफेयर? झाला मोठा खुलासा
Shoaib Malik and Sania Mirza: शोएबच्या या लग्नानंतर टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाला पाकिस्तानी जनतेचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतोय. सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना यांच्यावर लग्न मोडल्याबद्दल टीका केली जातेय.
Shoaib Malik and Sania Mirza: गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिकच्या नावाची खूप चर्चा रंगलीये. गेल्या आठवड्यात एक्ट्रेस आणि मॉडेल सना जावेदसोबत शोएब मलिकने लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाची अधिक चर्चा रंगू लागलीये. शोएबच्या या लग्नानंतर टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाला पाकिस्तानी जनतेचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतोय. सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना यांच्यावर लग्न मोडल्याबद्दल टीका केली जातेय. पाकिस्तानी क्रिकेटपटूला घटस्फोट देण्याच्या सानियाच्या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलंय.
3 वर्षांपासून सुरु होतं शोएबचं अफेअर?
'समा टीव्ही'वरील पॉडकास्टमधून दावा करण्यात आला आहे की, विवाहित असूनही शोएब मलिक आणि सना जावेद यांचं गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होतं. इतकंच आणि दोघांचे घनिष्ठ नातं असल्याचं म्हटलंय. या पॉडकास्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, सना जावेदने शोएब मलिकशी लग्न करण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच तिचा माजी पती उमेर जसवाल याला घटस्फोट दिला होता.
शोएब सनाच्या लग्नांनंतर मोठा खुलासा
या पॉडकास्टमध्ये असं म्हटलं गेलंय की, जेव्हा पण शोएब मलिकला चॅनलवर एखाद्या शोसाठी बोलवण्यात यायचं तेव्हा सना जावेदलाही बोलावलं पाहिजे या अटीवर तो तयार व्हायचा. पॉडकास्टच्या निर्मात्याने सांगितलं की, 'दोघांचं गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होते. उमेरला याबद्दल माहिती नव्हती, परंतु सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबाला याची कल्पना होती. मलिकच्या कुटुंबालाही याची माहिती होती.
2010 मध्ये झालं होतं सानिया-मलिकचं लग्न
हैदराबादमझ्ये शोएब मलिक आणि सानियाचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. 2020 मध्ये सना आणि जसवालचे लग्न झाल. शोएब मलिकने सोशल मीडियावर सना जावेदशी (Sana Javed) लग्न केल्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा अधिकृतपणे वेगळं झाल्याचं उघड झालं.
शोएब मलिक आणि सानियाने गेल्या वर्षी दुबईत त्यांच्या मुलाचा 5 वा वाढदिवस साजरा केला होता. सानियाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिचा शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला तेव्हाही, मलिकने तिच्या कारकिर्दीतील कामगिरीचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.