World Cup : पुण्याच्या स्टेडियमध्ये वर्ल्डकपचा भारत विरूद्ध बांगलादेश ( India vs Bangladesh ) यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने बांगलादेशाचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ( Team India ) वर्ल्डकपमधील सलग चौथा सामना जिंकला आहे. यामुळे टीम इंडियाचे एकूण 8 पॉईंट्स झाले असून पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं, मात्र टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने विराट सोडून या खेळाडूला विजयाचं श्रेय दिलं आहे. 


टीम इंडियाच्या विजयावर काय म्हणाला रोहित शर्मा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ( Team India ) चौथा सामना जिंकला असून या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'आमच्यासाठी हा एक मोठा विजय होता. आम्ही याची आतुरतेने वाट पाहत होतो. या सामन्यात आमची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र पण मधल्या आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये टीमच्या खेळाडूंनी सामना आमच्याकडे खेचला. कोणत्या लेंथने गोलंदाजी करायची हे समजून घेण्यात आमचे गोलंदाज हुशार होते.


'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय


रविंद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) गोलंदाजी आणि कॅच घेण्यात हुशार आहे, मात्र तुम्ही सेंच्युरीला हरवू शकत नाही. आम्ही एक ग्रुप म्हणून चांगली कामगिरी करतोय. हार्दिक पांड्याला थोड्या वेदना होतायत. मात्र काही मोठी गोष्ट नाहीये. संघातील प्रत्येकजण दबावातून जात असून चाहते मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतायत, असंही रोहितने सांगितलंय.


कोहलीची तुफान खेळी


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 103 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात विराटने 97 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यात त्याने 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. विराटच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 41 व्या ओव्हर्समध्ये विजयाचं आव्हान पार केलं. या शानदार खेळीमुळे विराट प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84, अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 55 आणि पाकिस्तानविरुद्ध 16 रन्स केले आहेत. 


विराट आता शतकांच्या अर्धशतकापासून दोन पावलं तर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमापासून दोन पावलं दूर आहे. सचिनने 463 एकदिवसीय सामन्यात 49 शतकं आणि 96 अर्धशतकं नोंदवली आहेत. तर विराटने अवघ्या 285 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 48 शतकं ठोकली आहेत.