मुंबई: एका फलंदाजाने टोलवलेला चेंडू पाहून सोशल मीडियावर सर्वांना ऋषभ पंतची आठवण झाली. अनेकांनी तर ऋषभची कॉपी केल्याचंही म्हटलं आहे. कोण आहे हा फलंदाज आणि त्याने नेमकं असं काय केलं? न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात कीवी फलंदाज डेव्हन कॉनवेने असा शॉट खेळला की सर्वजण पाहातच राहिले. त्याने टोलवलेल्या चेंडूमुळे सर्वांना एक क्षण ऋषभ पंतची आठवण आली. 
 
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात डेव्हन कॉनवेने मुस्तफिजुर रहमानचा उलटा स्कूप शॉट खेळला. चेंडू असा काही टोलवला गेला की थेट षटकार बसला. डेव्हन कॉनवेच्या या शॉटने सर्वांना ऋषभ पंतची आठवण करून दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी -20 मालिका खेळली गेली तेव्हा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने जोफ्रा आर्चरवर रिव्हर्स स्कूपवर असा षटकार ठोकला होता. हा षटकार पाहून सर्वांच्या आश्चर्यानं भुवया उंचावल्या होत्या.


यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने जेम्स एन्डरसनच्या चेंडूवर Reverse Scoop Shot वर षटकार ठोकला होता. त्याच्या या षटकाराची क्रिकेटविश्वात तुफान चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा त्याची कॉपी करणाऱ्या या फलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही ऋषभने ठोकलेल्या त्या षटकाराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.