`मी सत्याच्या मार्गावर...` युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा!
Dhanashree Verma Post: धनश्रीनेदेखील स्टेट्स ठेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
Dhanashree Verma Post: टीम इंडियाचा खेळाडू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोटाच्या चर्चा माध्यमांमधून समोर आल्या आहेत. युझवेंद्र चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पत्नी धनश्रीचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण धनश्रीने मात्र तिच्या अकाऊंटवर युजवेंद्र चहलचे फोटो ठेवले आहेत. युजवेंद्रने एक स्टेट्स ठेवला होता. पण धनश्री वर्माची यावर काही प्रतिक्रिया आली नव्हती. आता धनश्रीनेदेखील स्टेट्स ठेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. काय म्हणाली धनश्री? जाणून घेऊया.
मागचे काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण काळ होता. तर्कशून्य लेख, सत्यता न तपासता केलेले वृतांकन, माझ्या चारित्र्यावर उभे केलेले प्रश्न आणि ट्रोलिंग यामुळे मी खूप अस्वस्थ झाली आहे. मी माझे करिअर बनवण्यासाठी गेली काही वर्षे खूप मेहनत घेतली आहे. माझी शांतता हा माझा दुबळेपणा नाही तर ही माझी ताकद आहे. नकारात्मकता ऑनलाइन माध्यमातून वेगाने पसरतेय. मी सत्याचा मार्ग निवडलाय आणि त्यावरच पुढे चालली आहे. माझे सिद्धांत माझ्यासोबत आहेत. खऱ्याला कोणत्या स्पष्टीकरणाची गरज नसते.
युजवेंद्र चहल दिसला मिस्ट्री गर्लसोबत
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, चहल आणि युजवेंद्र अलीकडेच मुंबईत एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. या तरुणीबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही, मात्र असा दावा केला जात आहे की जेव्हा चहल तिच्यासोबत हॉटेलमध्ये दिसला तेव्हा तो चेहरा लपवताना दिसला होता.याचा एक व्हिडीओही समोर आला असून यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमुळे आता क्रिकेटरचे अफेअर असल्याचे सर्वांनाच वाटू लागले आहे.
घटस्फोटाच्या चर्चांमागे कारण काय?
युजवेंद्र आणि धनश्री यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे शनिवारी दोघांच्या संभाव्य घटस्फोटाच्या अफवा पसरल्या. त्यांच्या जवळच्या काही लोकांनी मतभेत झाल्याने घटस्फोट घेतला जात असल्याचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही मागील अनेक काळापासून वेगळे राहत आहेत. पण दोघांनी अद्याप यावर अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. याआधी 2022 मध्येही दोघांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा होती. याचं कारण तेव्हा धनश्रीने आपल्या नावातून 'चहल' आडनाव हटवलं होतं. पण नंतर त्यांनी पोस्ट करुन सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं होतं. धनश्री वर्मा कोरिओग्राफर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 62 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2020 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते. घटस्फोटाच्या या चर्चेदरम्यान धनश्री वर्मा लोकप्रिय कोरिओग्राफर प्रतीक उतेकरला डेट करत आहे असं म्हंटलं जात आहे. धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा सुरू झाल्या.