Dhanashree Verma ने श्रेयस अय्यरला केलं प्रपोज? फोटो पोस्ट करत लिहिलं `Love You`
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही स्टोरी केल्या आहेत. यामध्ये तिचे फ्रेंड्स असून सोबत टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील आहे. त्यामुळे पुन्हा एकदा श्रेयस आणि धनश्रीच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे.
Shreyas Iyer & Dhanashree Verma snapped at a social gathering : सध्या आयपीएल सुरु असून युझवेंद्र चहलची टीम राजस्थान रॉयल्सला सामना आज दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दरम्यान युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. यावेळी धनश्री पुन्हा एकदा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतंच धनश्री आणि श्रेयर यांना पुन्हा एकदा स्पॉट करण्यात आलंय. यावेळी धनश्रीने श्रेयससोबत तसंच आपल्या मित्रांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही स्टोरी केल्या आहेत. यामध्ये तिचे फ्रेंड्स असून सोबत टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील आहे. त्यामुळे पुन्हा एकदा श्रेयस आणि धनश्रीच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. शनिवारी धनश्रीने ही स्टोरी शेअर केली असून त्यामध्ये KISS चं इमोजी देखील दिसून येतंय.
धनश्रीने अय्यरला केलं प्रपोज?
धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सातत्याने सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. यावेळी तिने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर फोटो शेअर केलेत. हे फोटो रमजानच्या इफ्तार पार्टीचे असल्याची माहिती आहे. यावेळी चाहत्यांनी या फोटोंमध्ये श्रेयस अय्यरला स्पॉट केलं आहे. यावेळी या फोटोंवर, माय क्यूटीज असं लिहिलंय. यासोबत एका फोटोवर लव्ह यू असंही लिहिलंय. हे पाहून धनश्रीने अय्यरला प्रपोज केलं असल्याचं सोशल मीडियावर बोललं जातंय.
इफ्तार पार्टीमध्ये हा ग्रुप फोटो काढण्यात आला आहे. ज्यामध्ये अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर देखील होती. श्रेष्ठा ही धनश्री वर्मा प्रमाणे डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. या फोटोमध्ये श्रेयस अय्यर अगदी शेवटी उभा आहे.
यापूर्वीही धनश्री आणि श्रेयसचे फोटो झालेले व्हायरल
अय्यर आणि धनश्री वर्मा एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. शार्दुल ठाकूरच्या लग्नामध्ये हे दोघं दिसले होते. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेहसोबत या दोघांचा फोटो व्हायरल झाला होता.
दुखापतीमुळे श्रेयर अय्यर WTC मधून बाहेर
काही दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरला सराव सामन्यातदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं समोर आलं होतं. टीम इंडियासाठी ही फार धक्कादायक बाब मानली जातेय. कारण आयपीएलनंतर श्रेयर अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर झाला आहे.