मुंबई  : टीम इंडियाचा स्पिनर बॉलर युझवेंद्र चहल (yuzvendra chahal)  आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात दुरावा आल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांत झळकली होती. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चहलचे आडनाव हटवल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. या चर्चेवर युझवेंद्र चहलने (yuzvendra chahal)  स्पष्टीकरण देऊन पुर्णविराम दिला होता. त्यानंतर आता धनश्री वर्माने या चर्चेवर मोठा खुलासा केला आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये ती काय म्हणाली ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय? 
धनश्री वर्माने (Dhanashree Verma) या पोस्टमध्ये चहल सोबतच्या नात्यावर व अनेक वैयक्तिक गोष्टींवर भाष्य केलंय. ती तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय, मी माझे डोळे उघडले तेव्हा मला खूप मजबूत आणि आत्मविश्वास वाटला. मला गेल्या 14 दिवसांपासून याची गरज होती.माझ्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे माझा आत्मविश्वास कमी झाला होता. ही दुखापत मला डान्स करताना झाली असल्याचे ती पोस्टमध्ये म्हणतेय. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे मी माझ्या घरी आराम करत होते आणि मी माझ्या पलंगावरून फक्त फिजिओथेरपीसाठी सोफ्यावर जात असे. पण या काळात मला माझे पती, माझे कुटुंब आणि माझ्या जवळच्या मित्रांची खुप साथ लाभल्याचे तिने सांगितले. 


धनश्री (Dhanashree Verma)  पुढे लिहते की,"डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मला पुन्हा डान्स करायचा असेल तर मला शस्त्रक्रिया करावी लागेल. मी माझ्या आयुष्यातील मूलभूत गोष्टीही नीट करू शकत नाही याचं खूप वाईट वाटलं.हीच वेळ होती जेव्हा मला चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज होती. आणि अशावेळी अचानक एक बातमी येते. हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटले. चहल आणि तिच्या नात्याबद्दल ऐकलेली बातमी द्वेष आणि दुःखाने भरलेली असल्याचाही संताप ती व्यक्त करतेय. 



मला एवढेच सांगायचे आहे की या दुखापतीनंतर मी माझे आयुष्य कसे पुढे नेणार याची मला भीती वाटते. शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने विश्रांती, पुनर्प्राप्ती आणि फिजिओथेरपीचा प्रश्न आहे. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे आणि ती याबद्दल नाराज असताना तिच्या आणि चहलच्या नात्याबद्दल आलेल्या बातम्यांनी तिला धक्का बसल्याचे ती सांगतेय.  


दरम्यान चहल (yuzvendra chahal)  सोबतच्या नात्यामध्ये दुरावा आलेल्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे तिच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.