मुंबई : IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. तर राजस्थानला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर राजस्थानचा फलंदाज जोस बटलरने युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोबत तूफान डान्स केला. या डान्सची खुप चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या फायनल सामन्यात पराभव झालेल्या राजस्थानचे खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसले आहेत. आयपीएलचा पर्पल कॅप होल्डर युझवेंद्र चहल आणि ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर पराभवानंतर सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांसोबत चहलची पत्नी धनश्री दिसली. 



त्याच झालं असं की, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री इन्टाग्रामवर विविध कंटेंट बनवत असते. त्याचप्रमाणे धनश्रीने युझवेंद्र चहल आणि जोस बटलर सोबत एक डान्स व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओत धनश्री बटलरला डान्स शिकवताना दिसत आहे. या व्हिडिओत तिघे धमाल मस्ती करताना दिसत आहेत.   


धनश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच तिने अनेक फोटोही पोस्ट केलेत, ज्यात हे तिघेही मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तिघांनी युजवेंद्र चहलच्या सिग्नेचर सेलिब्रेशन स्टाईलसाठी पोजही दिली. या भन्नाट फोटोंवर आता कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.