मुंबई : काश्मीर मुद्द्यावर ट्वीट करुन पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने  चांगलाच वाद ओढवून घेतलाय. या प्रकरणावरुन याआधी गौतम गंभीरने ट्वीट करुन आफ्रिदीला सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि विराट कोहलीनेही त्याला उत्तर दिलेय. आता याप्रकरणावरुन गब्बर म्हणजे शिखर धवनही आफ्रिदीवर चांगलाच भडकलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखरने ट्वीट करत आफ्रिदीला म्हटलेय, आधी स्वत:च्या देशाची स्थिती सुधारा. आपले विचार स्वत:जवळच ठेवा. आम्ही आमच्या देशासाठी चांगलाच विचार करतोय. पुढेही चांगलेच होणार आहे. यात तुम्ही डोके लावू नये. 



याआधी शाहीद आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटलं होतं की काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. आत्मनिर्णय आणि स्वातंत्र्याचा आवाज दाबण्यासाठी निर्दोष लोकांना मारले जातेय. आणि आश्चर्य म्हणजे हे रोखण्यासाठी यूएन आणि अन्य संघटना कोणतेही पाऊल उचलत नाहीयेत. 



यानंतर गौतम गंभीरनेही विशेष शैलीत ट्विट करत आफ्रिदीला उत्तर दिले होते. 



त्यानंतर आफ्रिदीचा बोलण्याचा सूर बदलला. त्याने तिरंग्यासोबत एक फोटोही शेअर केलाय. 


मात्र तोपर्यंत गोष्ट खूप पुढे सरकली होती. आफ्रिदीच्या विधानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही वादाच्या मैदानात उतरला. तो म्हणाला देश चालवण्यासाठी आमच्याकडे योग्य व्यक्ती आहेत. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला याबाबत बोलण्याची वा जाणून घेण्याची गरज नाही. तर माजी कर्णधार कपिल देव म्हणाले, तो कोण आहे? आपण यांना इतकं महत्त्व का देतोय? अशा लोकांना आपण महत्त्व दिले नाही पाहि