मुंबई : सेल्फी मैने ले ली आज आणि दिलों का शूटर है मेरा स्कूटर या सारख्या रॅप साँगच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली ढिंच्याक पूजा नव्या रॅप साँगसह आलीये. ढिंच्याक पूजाला सोशल मीडियाने एका रात्रीत स्टार बनवले. ढिंच्याक पूजा आपल्या बेसुऱ्या गाण्यानंतरही अचानक सोशल मीडियावर प्रसिगद्ध झाली. सेल्फी मै ने ले ली आज या गाण्याने पुजाला इतके पॉप्युलर केले की ती बिग बॉसमध्ये पोहोचली. आता आयपीएलचा फिव्हर सध्या आहे यात पुजाही मागे कशी राहील. ढिच्यांक पुजाने आयपीएलदरम्यान एक रॅप साँग आणलेय. हे नवे रॅप साँग चेन्नईचा संघ आणि धोनीच्या सपोर्टसाठी आणलेय. हे गाणे तिने चेन्नईला डेडिकेट केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याद्वारे तिने चेन्नईला सपोर्ट दर्शवलाय. पुजाने आपल्या या गाण्यात चेन्नईच्या फलंदाजांना वाघ म्हटलेय. या गाण्याचे टायटल आहे 'चेन्नई (CSK Will Win) IPL2018'. हे गाणे वेगाने यूट्यूबवर प्रसिद्ध होतेय. 



आयपीएलमध्ये तब्बल दोन वर्षांनी चेन्नई संघाने पुनरागमन केले. दोन वर्षे चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या हंगामात चेन्नईने पुनरागमन केले. सध्या हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनो १० पैकी सात सामने जिंकलेत.