धर्मशाला : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होणार आहे.


बीसीसीआयने पोस्ट केला व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सकाळी ११.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. याआधी धोनीने श्रीलंकेसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये धोनी फास्ट बॉलिंग करतांना दिसत आहे.


धोनी करतोय फास्ट बॉलिंग


धोनी नेहमी नेटमध्ये बॅट्समन्सला प्रॅक्टीस सेशन दरम्यान स्पिन बॉलिंग करुन प्रशिक्षण देतो. पण आता धोनी फास्ट बॉलिंग करतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनीने ३ बॉल टाकले त्यापैकी बॅट्समन फक्त एकच बॉल खेळू शकला. 



धोनीच्या नावे विकेटकीपर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अधिक बॉलिंग करण्याचा रेकॉर्ड आहे.