मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई टीमने कोलकातावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या विजयाचे सेलिब्रेशन धोनीची मुलगी झिवाने शाहरुख खानसोबत केले. दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर चेन्नईने विजयी सलामी दिली. कोलकाताने चेन्नईसमोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान पाच विकेट कायम राखत पूर्ण केले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत झिवा शाहरुखसोबत मस्ती करताना दिसतेय. चेन्नईला सपोर्ट करण्यासाठी मैदानात बरेच फॅन्स होते. मात्र यात अशीही एक फॅन होती जिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. चेन्नईची ही छोटी फॅन दुसरी कोणी नसून महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा. झिवा आपल्या आईबरोबर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वडिलांच्या टीमला चीअरअप करण्यासाठी आली होती.



यावेळी शाहरुखही चेपॉकवर होता. क्यूट झिवाला पाहून शाहरुखला आपला मोह आवरता आला नाही. शाहरुख झिवासोबत मस्ती करताना दिसत होता. इतकंच नव्हे तर तो झिवाशी खेळताना तिच्याच वयाचा होऊन खेळत होता.