World cup 2019 : टीम इंडिया-न्यूझीलंड मॅच रद्द झाल्याने झिवा रडली?
वर्ल्डकपच्या १२ हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसामुळे व्यत्यय येत आहे.
ट्रेंट ब्रीज : पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मॅच रद्द करावी लागली. त्यामुळे अनेक चाहत्यांचा हिरमो़ड झाला. मॅच रद्द झाल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाली. त्यासोबतच धोनीची मुलगी झिवाला देखील मॅच रद्द झाल्याने दु:ख झाले. तिला मॅच रद्द झाल्याने रडू कोसळले, असं वृत्त काही वेबसाईटसने प्रकाशित केले आहे. दुसरीकडे तिचे रडतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या पहिल्या २ मॅचमध्ये विजय झाला होता. परंतु न्यूझीलंड विरुद्धची मॅच रद्द झाल्याने, टीम इंडिया आणि किवींना प्रत्येकी १-१ पॉइंट्स देण्यात आला.
पावसाचा अडसर
वर्ल्डकपच्या १२ हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसामुळे व्यत्यय येत आहे. आतापर्यंत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ४ मॅच रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे त्यात्या टीमला १-१ पॉईंट्स देण्यात आले.
सतत होणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे. पाऊस असताना अशा ठिकाणी वर्ल्डकपचे आयोजन का केले?, असा सवाल क्रिकेटचाहत्यांकडून केला जात आहे.
याआधी रद्द झालेल्या मॅच
पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. आतापर्यंत पावसामुळे एकूण ४ मॅच रद्द कराव्या लागल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात ७ जून रोजी मॅच खेळण्यात येणार होती. परंतु पावसाच्या गोंधळामुळे मॅच रद्द करण्यात आली.
यानंतर १० जूनला वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केवळ ७. ३ ओव्हर इतकाच खेळ झाला. पावसामुळे ही मॅच देखील रद्द झाली. यानंतर श्रींलका आणि बांगलादेश यांच्यातील मॅच रद्द झाली.
दरम्यान, टीम इंडियाची पुढील मॅच येत्या १६ तारखेला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. यामॅचवर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे ही मॅच होणार की पावसामुळे रद्द होणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष राहणार आहे.