मेलबर्न: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये त्याच्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. सिडनी वनडेमध्ये धोनीने 93 बॉलमध्ये 51 रन केले होते. यावेळी देखील धोनीवर टीका झाली होती. पण कॅप्टन कुलने त्या नंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. सिरीजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये नाबाद 54* आणि 87* रनची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने 3 सामन्यांमध्ये 2 वेळा नाबाद खेळी करत 193 च्या रनरेटने 73.10 च्या स्ट्राईक रेटने 193 रन केले आहे. सिरीजमध्ये शॉन मार्शने 223 रन केले त्यानंतर धोनीने 193 रन केले. धोनीला त्याच्या या शानदार खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार देण्यात आला. याआधी 7 वर्षापूर्वी 2011 मध्ये इंग्लंडमध्ये ५ सामन्यांच्या सिरीजमध्ये धोनीला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाल होता.


सिरीजमध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने सिरीजमध्ये बरोबरी केली. त्यानंतर तिसरा सामना कोण जिंकणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. भारताने तिसरा आणि निर्णायक सामना जिंकत इतिहास रचला. भारताच्या या विजयानंतर वर्ल्डकपसाठीची दावेदारी देखील भारताने सिद्ध केली. याआधी भारताने टेस्ट सिरीज देखील जिंकली होती.


भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला २३० रनवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाचा कोणताचा खेळाडू मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. याचं श्रेय भारतीय गोलंदाजांना जातं. युजवेंद्र चहलने या सामन्यात ६ विकेट घेत अनेक रकॉर्ड मोडले. या वनडे सिरीजमध्ये धोनीने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे निभावली.