मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या मेलबर्न वनडेमध्ये भारताने विजय मिळवत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला. धोनी आणि केदार जाधव यांनी भारताला विजय मिळवून दिला. ७ विकेटने भारताने हा विजय साकारला. सिरीजमध्ये धोनीने आपल्या खेळीने टीकाकरांना उत्तर दिलं आहे. त्यांच्या शानदार कामगिरीमुळे धोनी मॅन ऑफ द सिरीज ठरला. भारताने २-१ ने ही सिरीज जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर हा विजय साकारला आहे. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये पावसाचा व्यत्यय आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला २३० रनवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाचा कोणताचा खेळाडू मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. याचं श्रेय भारतीय गोलंदाजांना जातं. युजवेंद्र चहलने या सामन्यात ६ विकेट घेत अनेक रकॉर्ड मोडले. या वनडे सिरीजमध्ये धोनीने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे निभावली. त्याने पुन्हा एकदा तोच बेस्ट फिनिशर असल्याचं सिद्ध केलं. धोनीच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा कौतुकांचा वर्षाव सुरु झाला आहे. धोनीवर याआधी त्याच्या अपयशामुळे टीका होत होती. त्यामुळे धोनी वर्ल्डकप खेळणार की नाही ही चर्चा देखील आता बंद होणार आहे.


सिरीजमध्ये पहिल्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने सिरीजमध्ये बरोबरी केली. त्यानंतर तिसरा सामना कोण जिंकणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. भारताने तिसरा आणि निर्णायक सामना जिंकत इतिहास रचला. भारताच्या या विजयानंतर वर्ल्डकपसाठीची दावेदारी देखील भारताने सिद्ध केली. याआधी भारताने टेस्ट सिरीज देखील जिंकली होती.