Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये कसोटी खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठीचा संघ जाहीर झाला असून ही कसोटी सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने एका खेळाडूसंदर्भात सूचक विधान करत इशारा दिला आहे. त्याने या तरुण खेळाडूची तुलना थेट भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीशी करत तो धोनीहून सरस दिसत असल्याचं म्हणत सूचक इशारा समोरच्या संघाना दिला आहे.


कोण हा खेळाडू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्सचा माजी प्रशिक्षक रिकी पाँटींगने भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर पंत पुनरागमन करेल असं आपल्याला वाटलं नव्हतं असं प्रांजळ मत पाँटींगने व्यक्त केलं आहे. पंत 2024 चं आयपीएल खेळेल असंही आपल्याला वाटत नव्हतं, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पायाची अनेक हाडं मोडली होती. मात्र या साऱ्यावर मात करण्यासाठी त्याने 15 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेत या संकटावर मात करत दमदार पुनरागमन केलं. 


दमदार आयपीएल


आयपीएल 2024 पासून पंतने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. त्याने 13 डावांमध्ये 40.55 च्या सरासरीने 446 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेक 155.40 चा राहिला आहे. पंतने दिल्लीच्या संघाचं यंदा नेतृत्वही केलं. पंतच्या या कामगिरीने पाँटींग चांगलाच प्रभावित झाला असून त्याने 'स्काय स्पोर्ट्स'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)


आम्हाला वाटलं त्याला सबस्टीट्यूट म्हणून खेळवावं लागेल पण...


"खरोखरच त्याचं पुनरागमन कौतुकास्पद आहे. तुम्ही त्याच्या पायाकडे आजही पाहिलं आणि त्या अपघातात त्याच्याबरोबर काय झालं होतं हे त्याच्या तोंडून ऐकलं की त्याबरोबर आलेल्या मानसिक ताणाचा तुम्हाला अंदाज येईल. मात्र त्याने यावर मात केली. तो शेवटचं आयपीएलचं पर्व खेळेल असं मला वाटलं नव्हतं," असं म्हणत पाँटींगने पंतवर कौतुकाचा वर्षाव केला. "12 महिन्यांपूर्वी तो म्हणाला होता की, माझ्याबद्दल काळजी करु नका. मी तुम्हाला शब्द देतो की मी पुढच्या आयपीएलला असेल. तेव्हा आम्हाला वाटलं होतं की तो फलंदाजी करु शकेल आणि त्याला सबस्टीट्यूट खेळाडू म्हणून वापरावं लागेल. मात्र तो प्रत्येक सामना खेळला. तो आमच्यासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळला. तो वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. त्याचं नाव आता कसोटीच्या संघात आहे," असं पाँटींग म्हणाला.


नक्की वाचा >> सगळे एकाच टीममध्ये... रोहित ओपनर, मधल्या फळीत विराट-बाबर तर गोलंदाजीत बुमराह-आफ्रिदीचा मारा


भारतासाठी उत्तम कामगिरी


"त्याचं कमबॅक दमदार झालं. मी त्याला खेळताना आणि स्टम्प माईकमध्ये बोलताना ऐकलं आहे. त्याला उत्साह ट्रान्सफर करण्याची कला अवगत आहे. त्याला क्रिकेट आवडतं. तो खरा विजेता आहे," असं पाँटींग म्हणाला. पंतने टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक आव्हानात्मक मैदानांवर संयमी खेळी केल्या. त्याने आठ सामन्यांमध्ये 171 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबरोबरच त्याने उत्तम विकेटकिपींगही केलं. याचा भारतीय संघाला दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात फायदा झाला. 


धोनीशी केली तुलना


पंत हा केवळ धावांसाठी खेळत नाही तर तो मैदानात असतो तेव्हा आपला प्रभाव जाणवला पाहिजे अशी खेळी करतो असं पाँटींग म्हणाला. एवढ्यावरच न थांबता पाँटींगने त्याच्या कामगिरीच्या आकडेवारीची तुलना थेट धोनीशी केली. "तो काही धावा कराव्यात यासाठी खेळत नाही. तो खेळाचा आनंद घेत खेळतो. त्याच्या नावावर आताच 4 ते 5 शतकं असतील. तो 9 वेळा 90 ते 99 दरम्यान बाद झाला आहे. धोनीने 120 कसोटी (90) खेळल्या आहेत. त्याने 3 ते 4 शतकं (6) झळकावली आहेत. यावरुनच पंत किती उत्तम खेळाडू आहे हे दिसून येतं. तो क्रिकेट गांभीर्याने खेळाणारा खेळाडू आहे," असं सूचक विधान पाँटींगने केलं आहे. 


नक्की पाहा >> काही मिनिटं शिल्लक.. सर्व फिल्डर्स बॅट्समनच्या आजूबाजूला उभे केले अन्... मॅच फिरली! पाहा Video


धोनीची कामगिरी कशी?


पंतची कसोटीमधील सरासरी 43.67 इतकी असून त्याने 5 शतकं झळावली आहेत. तो केवळ 33 कसोटी खेळला आहे. धोनीने 90 कसोटींमध्ये 4876 धावा करत 6 शतकांसहीत करिअर संपवलं.