धोनी मारणार विमानातून उडी, फोटो केला शेअर
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या सुट्टयांमध्ये मजा करतो आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या सुट्टयांमध्ये मजा करतो आहे.
श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये तो फ्रेश होऊन मैदानावर येणार आहे. सीरीजमधली महिली मॅच धर्मशालामध्ये १० डिसेंबरला होणार आहे. पण याआधी धोनी स्काय डायविंग करण्याचा आनंद घेत आहे.
धोनीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो स्काय डायविंगसाठी तयार होतांना दिसत आहे. स्काय डायविंगमध्ये विमानातून काही हजार फूट उंचीवरुन पॅराशूट लावून उडी मारण्याचा आणि हवेवर तरंगण्याचा अनुभव वेगळाच असतो पण त्यासाठी धाडसी हृदय लागतं. धोनी याच रोमांचक अशा क्षणातून जाऊ इच्छितो आहे.