लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी १९२ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय बॉलर्स आणि फिल्डर्सनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ ओव्हर्समध्ये १९१ रन्सवर संपुष्टात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या तीन बॅट्समनना भारतानं रन आऊट केलं. यातल्या धोनीनं एबी डिव्हिलियर्सला केलेल्या रन आऊटमुळे या मॅचचं पारडं भारताच्या बाजूनं झुकलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता धोनीनं एबी डिव्हिलियर्सला रन आऊट केलं.


पाहा चपळ धोनीचा रन आऊट



 


भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अश्विन, पांड्या आणि जडेजाला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय होईल.


या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण सुरुवातीला आफ्रिकेचे ओपनर क्वान्टन डिकॉक आणि हशीम आमलानं सावध सुरुवात करत ७६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. डिकॉकनं ५३ आणि आमलानं ३५ रन्स केल्या तर तीन नंबरला आलेल्या डुप्लेसीला ३६ रन्स करता आल्या. सुरुवातीचे तीन खेळाडू वगळता आफ्रिकेच्या बॅट्समननं भारतीय बॉलर्ससमोर लोटांगण घातलं. या मॅचमध्ये भारतानं उमेश यादवऐवजी आर. अश्विनला संधी दिली होती.