धोनी बोलला, या बॉलरमुळे हरलो
या बॉलरमुळे झाला चेन्नईचा पराभव
मोहाली : चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने पंजाबच्या विरोधात 44 बॉलमध्ये 79 रनची तुफानी खेळी केली. पण चेन्नईला 4 रनने पराभव स्वीकारावा लागला. धोनीने सामन्यानंतर बोलताना पंजाबच्या टीमचं कौतुक केलं. सोबतच त्याने आणखी एका बॉलरचा उल्लेख केला.
धोनीने म्हटलं की, 'हा खूप अटीतटीचा सामना होता. ज्यामध्ये पंजाबची टीम चांगली खेळली. आम्हाला अजून चांगली बॉलिंग करावी लागेल आणि आणखी फोर मारावे लागतील. फिल्डिंगपण ठीक होती. या गोष्टी चांगल्या केल्या तर आम्ही परिस्थिती बदलू शकतो. बॅटिंग करत असताना मी बाकी काहीच विचार करत नव्हतो.
धोनीने पंजाबचा बॉलर मुजीब उर रहमानचा खास उल्लेख केला. ख्रिस गेलने चांगली बॅटिंग करत अँड नंतर मुजीबने चांगली बॉलिंग करत मोठा अंतर तयार केला.
पंजाबचा बॉलर मुजीब उर रहमानने या मोठ्या सामन्यात 3 ओव्हरमध्ये फक्त 18 रन दिले. यामुळे चेन्नईवर दबाव वाढला. धोनीने चांगली बॅटिंग करत नंतर रन्सचा मोठा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न केला पण 4 रनने चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला.