वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचं लाजीरवाणं रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा ११ रन्सनी पराभव झाला आहे.
अॅण्टिग्वा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा ११ रन्सनी पराभव झाला आहे. १९० रन्सच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ४९.४ ओव्हरमध्ये १७८ रन्सवर ऑल आऊट झाला.
भारतीय फलंदाजांच्या संथ खेळीमुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. या मॅचमध्ये धोनीचं लाजीरवाणं रेकॉर्ड झालं आहे. वनडेमध्ये २००१नंतर सगळ्यात जास्त बॉल घेऊन हाफ सेंच्युरी मारण्याचा रेकॉर्ड धोनीनं बनवला आहे. या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी मारायला धोनीला १०८ बॉल लागले. धोनीच्या या खेळीमध्ये फक्त एका फोरचा समावेश होता. धोनीनं ही खेळी ४७.३६च्या स्ट्राईक रेटनं केली.
२००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध सौरव गांगुलीनं १०५ बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली होती. तर सौरव गांगुलीनंच पुन्हा २००७मध्ये १०४ बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली होती.