नवी दिल्ली : आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल 21 नोव्हेंबरला पुढील आयपीएलसाठी खेळाडूंना परत करण्याच्या धोरणाची घोषणा करणार आहे. अशी अपेक्षा आहे की प्रत्येक संघाला तीन खेळाडूंना परत करण्याची परवानगी मिळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय आणि एक विदेशी खेळाडू असे असू शकतात. मागील दोन वर्षांपासून बंदी असलेली टीम चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स पुढील हंगामापासून परत येत आहेत.


आयपीएलच्या अकराव्या हंगामात गुजरात लायन्स आणि राईजिंग सुपर जाईंटमध्ये दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. सीएसके आणि राजस्थान संघ गुजरात आणि पुणे संघातील खेळाडूंची निवड करू शकते. याशिवाय, 2017 मध्ये आयपीएलमध्ये खेळणारा संघ आपल्या तीन खेळाडू परत करणार आहेत.


चेन्नई सुपर किंग्ज पुढील आयपीएलमध्ये परत येत आहे. तमिळ दैनिकच्या अहवालानुसार, चेन्नईने त्या तीन खेळाडुंची निवड केली आहे. महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन आणि डु प्लेसिस हे ते ३ खेळाडू असणार आहेत. टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक सुरेश रैनाला फ्रॅंचायझीने परत नाही घेतलं आहे.


धोनीच चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असेल. ज्यासाठी चेन्नई दुसऱ्या घरच्यासारखे आहे. विदेशी खेळाडू म्हणून, या संघाने डु प्लेसिसला रिटन घेतलं आहे. सीएसकेने टी-20 चा सर्वोत्तम गोलंदाज ड्वेन ब्राव्हो ऐवजी प्लेसिसची निवड केली आहे.