धोनी आणि झिवाच्या व्हिडीओने लाखोंची जिंकली मने
चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई : चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आयपीएल २०१८च्या फायनलमध्ये हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा बाद १७८ धावा केल्या. १७९ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या चेन्नईने शेन वॉटसनच्या नाबाद ११७ धावांच्या खेळीच्या जोरावर दोन विकेट राखत १८१ धावा केल्या. या विजयानंतर सगळीकडूनच धोनीचे कौतुक केले जातेय. लिलावानंतर ज्या संघाला म्हाताऱ्यांचा संघ असे म्हटले गेले होते त्याच संघाने कमाल केली आणि विजय मिळवला. धोनीने सिद्ध केले की वय हा केवळ आकडा आहे. जिंकण्यासाठी वयाचे बंधन नसते तर अनुभव आणि फिटनेस महत्त्वाचा असतो. फायनल सामन्यानंतर शेन वॉटसन आणि महेंद्रसिंग धोनीसोबत झिवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
खरंतर संपूर्ण आयपीएलमध्ये धोनीची मुलगी झिवाची चर्चा होती. अनेकदा ती आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरली होती. सगळ्या सामन्यांमध्ये ती धोनीसोबत दिसत अशेत. सामन्यानंतर धोनी आणि झिवाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या व्हिडीओजने लाखो लोकांची मने जिंकलीत.