धोनीच्या एका सल्ल्याने बदललं करिअर, या खेळाडूची कबुली
धोनीच्या सल्ल्यामुळे करिअर बदलल्याची भावना या युवा खेळाडूने व्यक्त केली आहे.
मुंबई : IPL मध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या यॉर्कर स्पेशलिस्ट टी नटराजन (T Natarajan) याने आपल्या यशाचं श्रेय महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)ला दिलं आहे. टी. नटराजन (T Natarajan) याने मागच्या आयपीएल सीजनमध्ये शानदार कामगिरी केली. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियात स्थान मिळालं.
टी. नटराजन (T Natarajan) याने खुलासा केला की, मागच्या वर्षी आयपीएल दरम्यान माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याला स्लो बाउंसर आणि कटर टाकण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे त्याच्यातल टॅलेंट बाहेर येण्यात मदत झाली. टी. नटराजन याने मागील आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक 71 यॉर्कर टाकल्या होत्या. त्याने धोनी आणि एबी डिविलियर्स सारख्या खेळाडूंना आऊट केलं होतं.
'धोनी सारख्या खेळाडू सोबत बोलणं हीच एक मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझ्य़ा फिटनेसबाबत मला मोटिवेट केलं. त्याने दिलेल्या सल्ला यामुळे मला फायदा झाला.'
मागच्या सीजनमध्ये सनराइजर्स हैदराबादचा बॉलर नटराजनने धोनीला आऊट केलं होतं. त्याच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात सुवर्ण संधी मिळाली.