मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वा मोसम संकटात सापडला आहे. आयपीएल संकटात सापडल्यामुळे धोनीच्या टीम इंडियातल्या पुनरागमनाविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताचे दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी मात्र धोनीचं भारताकडून पुन्हा खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे, असं वक्तव्य केलं आहे. धोनी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळेल, असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा १३वा मोसम २९ मार्चपासून सुरु होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण सध्याची परिस्थिती बघता आयपीएल रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.


धोनी शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच मागच्यावर्षी वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी मैदानात उतरलेला नाही. आयपीएलसाठी धोनीने सरावही सुरु केला होता, पण कोरोनामुळे तो पुन्हा रांचीला निघून गेला.


धोनीचं टीम इंडियामधलं पुनरागमन त्याच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर अवलंबून असेल, असं वक्तव्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. पण आता आयपीएलच होणार नसेल, तर मात्र धोनीसाठी परतीचे दरवाजे बंद व्हायची शक्यता आणखी बळावेल.