मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीमुळे धोनीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. धोनीने भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या शेवटच्या दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे फोटो त्यांच्या विक्रमासोबतच्या माहितीबरोबर पोस्ट करत असते. आता हा मान धोनीने मिळवला आहे. धोनीचा फोटो आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटच्या कवर फोटोवर लावण्यात आला आहे.


 



गेल्या अनेक सीरिजपासून धोनीला चांगली कामगिरी करण्यासाठी सूर गवसत नव्हता. पण धोनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत फॉर्ममध्ये आला. धोनीने या तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या दोन सामन्यात धोनीने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. धोनीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११४ बॉलमध्ये नाबाद ८७ रनची खेळी केली.



आयसीसीने केला सन्मान


ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ जानेवारीला दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतरही आयसीसीनं #10YearsChallenge या ट्रेण्डमध्ये सहभागी होत, धोनीचा १० वर्ष जुना आणि सध्याचा फोटो ट्विट केला. धोनी आधीही सिक्स मारून मॅच जिंकवायचा, आता १० वर्षांनीही तो अशीच कामगिरी करत आहे, असं कॅप्शन आयसीसीनं या फोटोला दिलं होतं. दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारत भारताला विजयाजवळ आणलं. यानंतर १ रन काढून धोनीनं भारताला ४ बॉल आणि ६ विकेट राखून जिंकवून दिलं. 


धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी कामगिरी केल्याने त्याला मालिकावीर या किताबाने गौरवण्यात आले. धोनीला हा मालिकावीर किताब मिळाला तेव्हा त्याचे वय 37 वर्ष 195 दिवस इतके होते. सर्वाधिक वय असताना मालिकावीर हा किताब मिळवणारा धोनी हा पहिला खेळाडू झाला आहे. धोनीचा हा वनडे कारकिर्दीतील हा सातवा मालिकावीर किताब होता.