टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाल्यावर कसं वाटलं? ध्रुव जुरेलने सांगितला बसमधील जागेचा मजेशीर किस्सा; पाहा Video
Dhruv Jurel First Impression : टीम इंडियामध्ये ध्रुव जुरेलला संधी दिली गेली. टीम इंडियामध्ये (IND vs ENG Test squad) एन्ट्री झाल्यानंतर कसं वाटलं? यावर बोलताना ध्रुवने मोठं वक्तव्य केलंयय.
Dhruv Jurel, IND vs ENG Test squad : उद्यापासून म्हणजेच येत्या 15 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकल्याने आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. एकीकडे विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या खेळाडूंना बाहेर बसावं लागल्याने आता युवा खेळाडूंच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. अशातच आता टीम इंडियामध्ये ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याला संधी देण्यात आलीये. तिसऱ्या टेस्टमध्ये विकेटकिपर ध्रुव जुरेल डेब्यू करताना दिसणार आहे. अशातच टीम इंडियामध्ये संधी मिळाल्यावर काय वाटलं? यावर ध्रुव जुरेलने भावना व्यक्त केल्या आहेत.
यशस्वी जयस्वालने ध्रुव जुरेलची मुलाखत घेतली. मला जेवण बनवण्यास आवडतं. तसेच मला कधी कधी एकटं रहायला आवडतं, असं ध्रुव जुरेल याने अडखत अडखत सांगितलं. त्यानंतर यशस्वीने ध्रुवची फिरकी घेतली. टीम इंडियाच्या बसमध्ये जागा कधी मिळवली? तुला कसं कळालं की कोणती तुझी जागा आहे? असा सवाल यशस्वीने केला. त्यावर ध्रुवने मजेशीर उत्तर दिलं.
काय म्हणाला ध्रुव जुरेल?
मला जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा मी थोडा निराश झालो. मी काहीसा घाबरलेला आणि चिंतेत होतो. मला संघात जागा मिळवण्याची गरज नाहीये. जर मी बसमध्ये जाऊन कुठल्याही जागेवर जाऊन बसलो असतो, तर कोणीतरी येऊन मला सांगितलं असतं ही माझी जागा आहे. त्यामुळे मी खरंच निराश झालो होतो. त्यामुळे मी प्लॅन केला, जर बस सकाळी 8 वाजता निघणार असेल तर मी 7.59 ला बसमध्ये जाईल, असं मी ठरवलं होतं, असं ध्रुव जुरेलने म्हटलं आहे. जेव्हा इतर खेळाडू सेटल होतील, तेव्हा मला माझी जागा आपोआप समजेल, असंही ध्रुवने सांगितलं.
जर मला या मालिकेमध्ये टीम इंडियाची कॅप मिळाली तर मी हा क्षण माझ्या वडिलांना समर्पित करेल. माझे वडिल माझ्यासाठी हिरो आहेत. जेव्हा मला काहीही समजत नाही, तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो आणि त्यानंतर सर्वकाही ठीक होतं. ते माझे फक्त मार्गदर्शक नाही तर माझ्यासाठी हिरो आहेत, असंही ध्रुवने म्हटलं आहे.
पाहा Video
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक -
तिसरी कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला.