Rohit Sharma: रोहित शर्मा अनेक गोष्टी विसरतो, याची आता प्रत्येकाला माहिती झालीये. कधी साखरपुड्याची अंगठी, कधी पासपोर्ट तर कधी आयपॅड देखील हिटमॅन विसरला असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात टॉसनंतर फलंदाजी निवडायची की गोलंदाजी हे देखील रोहित विसरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजीला जात असताना बॅट विसरला असल्याचा दावा केला जातोय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिटमॅनची विसरण्याची सवय जग जाहीर आहे. विराट कोहलीने एका इंटरव्युमध्ये स्पष्ट केलं होतं की, रोहित शर्मा अनेकदा महागड्या गोष्टी देखील विसरतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून रोहित शर्मा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी सामन्यात बॅट घेऊन मैदानात जायला विसरला असल्याचा दावा केला जातो. मात्र यामध्ये किती तथ्य आहे, ते पाहुयात. 


या व्हिडीओमध्ये किती तथ्य?


मात्र हा व्हिडीओ रोहित शर्माचा नसल्याचं पडताळणीमध्ये समोर आलं आहे. जर तुम्ही व्हिडीओ नीट पाहिल्यास तो बराच जुना असल्याचं तुम्हाला. मैदानात उतरणाऱ्या फलंदाजाच्या जर्सीवर नंबर नाहीये. जर्सीवर क्रमांक लिहिण्याचा नियम 3 वर्षांपूर्वी लागू झाला आहे. हा व्हिडिओ 2017 मधला असून तो पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियन फलंदाज फवाद अहमद आहे. फवाद अहमद मैदानावर उतरताना बॅट घ्यायला विसरल्याचं दिसून येतंय. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटच्या सामन्याचा हा व्हिडिओ आहे.



टेस्ट सामन्यात रोहित शर्मा फेल


वर्ल्डकपच्या पराभवानंतर रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट सामन्यात टीमचं नेतृत्व करतोय. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची 2 टेस्ट सामन्यांची सिरीज असून दुसरा टेस्ट सामना केपटाऊनमध्ये खेळवला जातोय. पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे हिटमॅनवर मोठ्या प्रमाणात टीका होता. दुसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 


दुसऱ्या टेस्टसाठी कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.