IND vs ENG 3rd Test, Rohit Sharma: सध्या राजकोटच्या मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडिया मजबूत परिस्थितीत दिसून येतेय. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. रोहित शर्माचा हा अंदाज चाहत्यांसाठी काही नवा नाही. तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड फलंदाजी करत असताना ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून आलेल्या रोहित शर्माचं हिंदी वेगळं असून चाहत्यांना मात्र त्याची ही शैली फार अवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित शर्मा 'हम लोगों को तीन ओवर को लगेगा' असे म्हणताना दिसतोय.


रोहित शर्माचा नवा ऑडियो व्हायरल


हा व्हायरल व्हिडिओ राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात आणि इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने डावाची 68 वी ओव्हर पूर्ण केली. या व्हिडीओमध्ये सिराज ओव्हर पूर्ण करून निघून जातो. अशातच कर्णधार रोहित शर्मा म्हणतोय, "जल्दी तो मांगो बॉल यार, हम लोग तीन ओवर पीछे हैं. अगर ये ऑलआउट हो गया न तो हम लोगों को वो लगेगा."


'वो' चा नेमका अर्थ काय?


दरम्यान या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या 'वो' चा अर्थ काय हे स्पष्ट झालं नाही. कदाचित भारतीय कर्णधार पेनल्टीबद्दल बोलत असेल असा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र तरीही रोहित शर्माला काय म्हणायचे होते हे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.


रोहित शर्माची टपोरी भाषा


रोहित शर्माची टपोरी भाषा चाहत्यांना फार आवडते. एकदा विराट कोहलीनेही त्याच्या मुलाखतीत खुलासा केला होता की, रोहित शर्मा बऱ्याचदा इतकी अशी भाषा बोलतो जी प्रत्येकाला समजणं सोपं नसतं.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.