मुंबई : निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचे वक्तव्य चुकीचे आणि निराधार असल्याचे एन श्रीनिवासन यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवड समितीचे अध्यक्षपद ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. यानंतर एकच खळबळ उडाली.


अशी झाली विराटची निवड


विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री पटली. म्हणून श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात विराटची निवड करण्याचे आम्ही ठरवले. त्याचा तिथे कस पाहता येईल, अशी अपेक्षा होती.


संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होते.


तेव्हा बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते. ते तामिळनाडूचे अध्यक्षही होते.


जेव्हा एखादा क्रिकेटर अशा प्रकारचे वक्तव्य करतो तेव्हा ते चांगले वाटत नाही असे श्रीनिवासन यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्या बोलण्यात काही सत्यता नव्हती. आता हे बोलण्यात काय अर्थ आहे ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


बद्रीला बाहेर बसावे लागत होते...


मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले. पण ते तडकाफडकी के. श्रीकांतला घेऊन तत्कालिन बोर्ड अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला.


कारकिर्द आव्हानात्मक


वेंगसरकर म्हणाले की, दोन वर्षे भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ही जबाबदारी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती. तेव्हा ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा होत असे. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे संघ खेळत.


त्यात आम्ही २३ वर्षांखालील संघ घेऊन जायचे ठरवले. तेव्हा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकलो होतो. त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला आम्ही त्या स्पर्धेसाठी निवडले. त्यात विराटने १२३ धावांची नाबाद खेळी केली होती.


अशी झाली विराटची निवड


विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री पटली. म्हणून श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात विराटची निवड करण्याचे आम्ही ठरवले. त्याचा तिथे कस पाहता येईल, अशी अपेक्षा होती. संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही.


त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होते.


तेव्हा बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते. ते तामिळनाडूचे अध्यक्षही होते.


वेंगसरकरांच्या आरोपात किती तथ्य?


विराट कोहलीला संघात घेण्याच्या विरोधात धोनी, कर्स्टन आणि एन. श्रीनिवासन होते असा सूर वेंगसरकरांनी आळवला आहे. २००८ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजबाबत वेंगसरकर बोलत आहेत. पण या सीरिजच्या पाचही मॅचमध्ये कोहलीला संधी देण्यात आली होती.


एवढच नाही तर या कर्स्टन आणि धोनीनं विराटला ओपनिंगला बॅटिंग करायचीही संधी दिली होती. एवढच नाही तर या ५ मॅचपैकी तिसऱ्या आणि चौथ्या या दोन्ही मॅचमध्ये बद्रिनाथ टीममधून खेळला होता.