कोलंबो : निदहास ट्रॉफीमध्ये विजयाचा सूत्रधार ठरला तो दिनेश कार्तिक. त्याने अशक्य ते शक्य करुन दाखवत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ८ चेंडूत जो कारनामा केला त्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. कार्तिने ८ चेंडूत २९ धावा कुटल्या. यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष पांडे बाद झाल्यानंतर कार्तिक १९व्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी क्रीझवर आला. त्यावेळी टीम इंडियावा १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या.


अखेरच्या दोन ओव्हर


१८.१ - कार्तिकने रुबेलच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. आता ११ चेंडूत २८ धावांची गरज


१८.२ - रुबेलच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकला. आता संघाला १० चेंडूत २४ धावांची गरज


१८.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पुन्हा षटकार ठोकला. जिंकण्याच्या आशा वाढू लागल्या. टीम इंडियाला आता ९ चेंडूत १८ धावांची गरज होती.
१८.४ - रुबेलने चौथ्या चेंडूवर कार्तिकला बीट केले. टीम इंडियाला ८ चेंडूत १८ धावांची गरज. 
१८.५ - १९व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर कार्तिकने दोन धावा काढल्या. आता संघाला ७ चेंडूवर १६ धावांची गरज.
१८.६ - रुबेलच्या अखेरच्या चेंडूवर कार्तिकने फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकला. आता टीम इंडियाला विजयासाठी हव्यात १२ धावांची आवश्यकता. 



 


१९वी ओव्हर


१९.१ - बांगलादेशकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सौम्या सरकार आला. बॅटिंगसाठी विजय शंकरकडे स्ट्राईक होता. सौम्याने पहिला बॉल वाईड टाकसला. भारताला ६ चेंडूत ११ धावांची गरज.


१९.२ - अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कार्तिक स्ट्राईकवर आला. आता भारताला ४ चेंडूत १० धावा हव्यात.


१९.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने केवळ एख धाव घेतली. स्ट्राईक पुन्हा विजय शंकरकडे. भारताला जिंकण्यासाठी ३ चेंडूत ९ धावा. 


१९.४ - चौथ्या चेंडूवर विजय शंकरने चौकार लगावला. आता संघाला विजयासाठी २ चेंडूत ५ धावांची गरज. मैदानात शांतता कारण कोणताही संघ यावेळी जिंकू शकत होता.


१९.५ - पाचवा चेंडू शंकर खेळला. त्याने हवेत शॉट भिरकावला आणि मेहंदा हसनच्या हातात कॅच दिला. आता शेवटचा एक चेंडू आणि धावा हव्यात ५.


१९.६ - शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर दिनेश कार्तिक. जिंकण्यासाठी षटकार हवा. मॅच ड्रॉ करण्यासाठी चौकार. सौम्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक्स्ट्रा कव्हरवरुन षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराने जावेद मियांदादची आठवण दिली.