Dinesh Karthik On Ind vs Ban: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जाणाल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात (Ind vs Ban 1st Odi) बांग्लादेशने भारताचा पराभव केलाय. हातातोंडाशी आलेला विजय बांग्लादेशने खेचून घेतला आणि 1 विकेटने सामना खिश्यात घातला आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असल्याने आता टीम इंडियाला  (Team India) मालिका विजयासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक असणार आहे. (dinesh karthik get angry on ind vs ban 1st odi kl rahul and washington sundar drop catches marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरा एकदिवसीय सामना (Ind vs Ban 2nd Odi) हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.पहिल्या सामन्यातील पराभवानंतर रोहितने निराशा व्यक्त केली होती आणि आगामी सामन्यात विजय आमचाच होणार, असा निर्धार देखील व्यक्त केला होता. भारताच्या पराभवानंतर आता अनेकांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता भारताचा स्टार फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणजेच डीकेने (DK) दोन खेळाडूंना झाप झाप झापल्याचं पहायला मिळतंय.


काय म्हणाल DK ?


सामन्याच्या निकालावर वरवर पाहता राहुलचा (KL Rahul) कॅच चुकला आणि वॉशिंग्टन (Washington Sundar) कॅच घ्यायला गेलाच नाही, तो का पुढे आला नाही माहीत नाही. मला माहित नाही की हे प्रकाशामुळं होतं की इतर काही कारण..., परंतु जर त्याने चेंडू पाहिला असता तर तो कॅच घेण्यासाठी गेला असावा. तो फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, असंही डीके (Dinesh Karthik) यावेळी म्हणाला आहे.


आणखी वाचा - PAK vs ENG 1st Test: रावलपिंडी टेस्टमध्ये इंग्लंडचा दणक्यात विजय; टी-ब्रेकनंतर असा पलटला गेम!


दरम्यान, टीम इंडियाने फिल्डिंगचा (Team India Fielding) फक्त 50 टक्के प्रयत्न केला. टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिवस नव्हता, परंतु खूप खराब दिवसही नव्हता. मला वाटतं की शेवटी दबावाखाली आम्ही काही फोरही चुकवले, असं डीके (Dinesh Karthik On Ind vs Ban) म्हणाला आहे. आता टीम इंडिया आगामी स्पर्धेत चांगला खेळ दाखवेल, अशी अपेक्षा देखील त्याने यावेळी व्यक्त केली आहे.