Pakistan vs England 1st Test: जीवाचा धोका पत्करून इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर (England tour of Pakistan, 2022) गेला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजचा (PAK vs ENG, 1st Test) पहिला सामना रावलपिंडी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी धुव्वा (England Defeat Pakistan By 74 Runs) उडवला आहे. या सामन्यातील अखेरचा दिवस सर्वात थरारक राहिला. कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) मोठा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला त्यांच्याच जाळ्यात फसवलं.
पाकिस्तानमध्ये इंग्लंडचा हा केवळ तिसरा कसोटी विजय ठरला आहे. 22 वर्षात इंग्लंडची पाकिस्तानच्या मैदानावर कसोटी सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. अखेरच्या (England Defeat Pakistan By 74 Runs In Final Thriller Day ) दिवशी टी-ब्रेकपूर्वी पाकिस्तानचा संघ सामना जिंकू शकेल किंवा सामना ड्रॉ तरी राहिल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र. इंग्लंडच्या गोलंदाजांनी घातक मारा सुरू ठेवला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकले नाही. पाकिस्तानचा दुसरा डाव 268 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने मोठा विजय मिळवला आहे.
The final wicket to fall.
Well played, @englandcricket#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/Rq3zFvPJSp— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 5, 2022
इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभा केला. त्यात एक दोन नव्हे तर 4 फलंदाजांनी शतक ठोकलं होतं. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने देखील 579 धावा खेचल्या. त्यानंतर निकाल काहीही लागो, मॅच मात्र तगडी होणार असं सर्वांनाच जाणवू लागलं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी घाई केली आणि लगेचच मैदान सोडलं. इंग्लंडने दुसऱ्या डावात 7 विकेटच्या बदल्यात 264 धावा केल्या आणि गोलंदाजांच्या नशिबी मॅच सोडली.
आणखी वाचा - Video: राईटी जो रुटनं केली लेफ्ट हँडेड बॅटिंग, क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का
दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या 343 धावांचं आव्हान पेलताना पाकिस्तानची फलंदाजी देखील कोसळली. सलामीवीरांना मोठी कामगिरी करता आली नाही. तर कॅप्टन बाबर (Babar Azam) देखील 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर रिझवान (Mohammad Rizwan) आणि शकिलने (Saud Shakeel) पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र, अँडरसन आणि रॉबिन्सनने घातक गोलंदाजींचा प्रभाव दाखवत दोघांना तंबुत परतवलं. रॉबिन्सन पाच विकेट घेत पाकिस्तानला पंच लगावला आणि त्यानंतर अँडरसनने सुट्टी दिली नाही. अखेरीस विजय खिश्यात घातला.