Dinesh Karthik appointed as England Lions batting consultant : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची बॅट थंडावल्याचं पहायला मिळालं. आयपीएलमध्ये त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला वनडे वर्ल्ड कप आणि इतर मालिकेत संधी मिळाली नाही. त्यामुळे कार्तिकने नवी वाट पकडली होती. अशातच आता टीम इंडियाला अनेक सामने जिंकवणाऱ्या दिनेश कार्तिकने मोठा निर्णय घेतला असून त्याने इंग्लंडच्या संघासोबत एक करार केल्याची (England Lions batting consultant) माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वास अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनलाय. इंग्लंड लायन्सच्या ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी दिनेश कार्तिकच्या खांद्यावर सल्लागारपदाची जबाबदारी देण्यात आलीये. दिनेश कार्तिकचा कार्यकाळ 10 जानेवारी ते 18 जानेवारी म्हणजेच केवळ नऊ दिवसांचा असणार आहे. तर नील किलन हे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. त्याचबरोबर कार्ल हॉपकिन्सन, रिचर्ड डॉसन, इयान बेल हे सहाय्यक प्रशिक्षक असतील. (Dinesh Karthik Has Been Appointed As England Lions Batting Consultant Against India A)


इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ मालिका वेळापत्रक


१२-१३ जानेवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम 
१७-२० जानेवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम
२४-२७ जानेवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम
१ -4 फेब्रुवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम


इंग्लंड लायन्स संघ: जोश बोहानन (कर्णधार), केसी अल्ड्रिज, ब्रायडन कार्स, जॅक कार्सन, जेम्स कोल्स, मॅट फिशर, कीटन जेनिंग्स, टॉम लॉस, अॅलेक्स लीस, डॅन मौसले, कॅलम पार्किन्सन, मॅट पॉट्स, ऑली प्राइस, जेम्स रीव्ह, ऑली रॉबिन्सन.


भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), बी. साई सुदर्शन, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, कोना भारत (यष्टीरक्षक), पुलकित नारंग, मानव सुथार, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वथ कवेरप्पा, आणि आकाश दीप.