नवी दिल्ली : निधहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशला टीम इंडियाने नाही तर दिनेश कार्तिकने हरवलयं. त्याच्या बॅटींगच कौतूक करायला सर्व क्रिकेटप्रेमींना शब्द अपूरे पडतायत. दिनेश कार्तिक ११ वर्षांपासून टीम इंडियाशी जोडला गेलाय तरीही त्याच्या वाट्याला खूप कमी मॅच आल्या आहेत. आपण बांगलादेशला धुणार असल्याची भविष्यवाणी कार्तिकने आधीच केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळीबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला, मी आज जेथे आहे तेथे खुश आहे. सपोर्ट स्टाफचेही धन्यवाद. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय.


गेम फिनिशर 


फिनिशरच्या भूमिकेबाबत बोलताना दिनेशने सांगितले, महेंद्रसिंग धोनीचा कूल नेचर मला आवडतो. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.



त्याच्या अनुभवातून खूप काही शिकलो. तो ज्याप्रमाणे गेम फिनिश करतो त्यातून खूप काही शिकता आले. यावेळी दिनेशने कोहलीचेही नाव घेतले. 


शेवटच्या दोन ओव्हरमध्ये हवे होते ३४ रन्स


भारतासमोर विजयासाठी बांगलादेशने १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी ३४ रन्स हवे होते. यावेळी कार्तिकने (८ बॉलमध्ये २९ रन्स) क्रीझवर पाय ठेवला. त्याने रुबेल हुसैनच्या १९व्या ओव्हरमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स लगावत २२ रन्स केले.


शेवटच्या ६ बॉलमध्ये भारताला १२ रन्स हवेत होते. यावेळी विजय शंकर पहिल्या बॉलवर आऊट झाला.


त्यानंतर एका बॉलमध्ये भारताला जिंकण्यासाठी ५ रन्स हवे असताना कार्तिकने सौम्या सरकारच्या बॉलवर सिक्सर खेचत विजय मिळवला. भारताचा टी-२०मध्ये बांगलादेशवर हा सलग आठवा विजय आहे.


आपल्या स्टाईलमध्ये मॅच संपवणार 


दिनेश कार्तिक बांगलादेशच्या बॉलर्सना धुवणार हे त्याच्या मनात आधीच पक्क होतं. त्याने यासदंर्भातील पोस्टही सोशल मीडियावर टाकली होती.


कार्तिकच्या मॅचविनिंग खेळीनंतर त्याची मॅचआधीची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.