कार्तिकची रणनिती, नितीश राणानं दोन बॉलमध्ये केलं विराट-एबीला आऊट
बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे.
कोलकाता : बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे. बंगळुरुनं ठेवलेल्या १७७ रन्सचा पाठलाग कोलकात्यानं १८.५ ओव्हरमध्ये केला. सुनिल नारायणनं १९ बॉलमध्ये ५० रन्सची खेळी केली. नारायणनं ५ फोर आणि ४ सिक्स लगावल्या. नितीश राणानं २५ बॉलमध्ये ३४ आणि दिनेश कार्तिकनं २९ बॉलमध्ये नाबाद ३५ रन्स केल्या. बंगळुरूच्या क्रिस वोक्सनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. उमेश यादवला २ आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.
त्याआधी बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या. बंगळुरूकडून मॅक्कलम, विराट आणि एबी डिव्हिलयर्सला चांगली सुरुवात मिळाली पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. मॅक्कलमनं २७ बॉलमध्ये ४३, विराटनं ३३ बॉल्समध्ये ३१ आणि एबीनं २३ बॉल्समध्ये ४४ रन्स केल्या. तर मनदीप सिंगनं १८ बॉलमध्ये ३७ रन्स केल्या.
कार्तिकची रणनिती
१५व्या ओव्हरपर्यंत बंगळुरुनं फक्त २ विकेट गमावल्या होत्या. एबी डिव्हिलयर्स जबरदस्त फटकेबाजी करत होता. एबीबरोबर विराट कोहलीही मैदानात होता. याचवेळी कोलकात्याचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं नितीश राणाला बॉलिंग केली. यानंतर नितीश राणानं दोन बॉलमध्ये दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
नितीश राणाचे अपशब्द
एबी आणि कोहली या दिग्गजांच्या विकेट घेतल्यावर कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात रोमांच पाहायला मिळाला. या दोन्ही विकेट घेतल्यानंतर राणालाही स्वत:वर संयम ठेवता आला नाही आणि त्यानं अपशब्द वापरले.