मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे सहाऐवजी पार्थिव पटेलला या मॅचमध्ये संधी देण्यात आली. आता जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी ऋद्धीमान सहाऐवजी दिनेश कार्तिकची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी टेस्ट सुरु व्हायच्याआधी म्हणजेच गुरुवारी सराव करताना सहाच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये सहाला खेळता आलं नाही. म्हणून टीममध्ये असलेला दुसरा विकेट कीपर पार्थिव पटेलला या मॅचमध्ये संधी देण्यात आली.


कार्तिक खेळला तर होणार हे रेकॉर्ड


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कार्तिक खेळला तर भारताच्या नावावर नवं रेकॉर्ड होणार आहे. ५७ वर्षांमध्ये भारत एका सीरिजमध्ये तीन वेगवेगळ्या विकेट कीपरसोबत आत्तापर्यंत कधीच खेळला नाही.


कार्तिकनं भारताकडून खेळल्या २३ टेस्ट


दिनेश कार्तिकनं भारताकडून २३ टेस्ट मॅच खेळला आहे. कार्तिक २०१० साली बांग्लादेशविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमधून कार्तिकनं टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. २३ टेस्टमध्ये कार्तिकनं एक हजार रन्स बनवल्या आहेत.


केप टाऊनमध्ये शून्यवर आऊट झाला होता सहा


केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये सहा शून्य आणि ८ रन्सवर आऊट झाला होता. पण सहानं या मॅचमध्ये धोनीचं रेकॉर्ड मोडलं होतं. सहानं केप टाऊन टेस्टमध्ये १० कॅच पकडले होते. एकाच मॅचमध्ये एवढे कॅच पकडणारा सहा पहिला भारतीय विकेट कीपर बनला होता. याआधी धोनीनं २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये ९ कॅच पकडले होते. सहानं या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये ५-५ कॅच पकडले.