मुंबई : आयपीएलमध्ये जेवढी तुमची उत्तम कामगिरी करण्यासाठी जिद्द आणि कौशल्य महत्त्वाचं असतं तसं कधीकधी नशीबही महत्त्वाचं ठरतं. दिनेश कार्तिकच्या बाबतीत नशिबानंच साथ दिली नाही. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर रनआऊट झालाच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला. त्यामुळे काही सेंकदाचा वेळ मिळतो अशी आशा होती. मात्र युजवेंद्रने संधी न दवडता पटकन रनआऊट केलं.


बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात रनआऊटचा ड्रामा पाहायला मिळाला. बंगळुरूच्या फलंदाजीवेळी दिनेश कार्तिक क्रीझवर होता. 13 व्या ओव्हरमध्ये रन आऊटचा ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर दिनेश कार्तिकला तंबुत परतण्याची वेळ आली. 


रनआऊट करण्याआधी युजवेंद्रच्या हातून बॉल सुटला. मात्र तेवढाही वेळ दिनेशला अपुरा पडला. युजवेंद्रने झटक्यात बॉल पुढे सरकवून रनआऊट केल्यानं कार्तिकला तंबुत परतावं लागलं. दिनेश कार्तिकने राजस्थान विरुद्ध 4 बॉलमध्ये 6 धावा काढल्या. 


दिनेश कार्तिक रनआऊट झाल्यानंतर बंगळुरूचा पराभव निश्चित झाला. तर राजस्थान टीमने रनआऊटचा जल्लोष मैदानात साजरा केला. टीममधील इतर खेळाडूंनी युजवेंद्रला उचलून घेतलं आणि सेलिब्रेशन केलं.


राजस्थान टीमने बंगळुरूवर 29 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थाननं 144 धावा केल्या तर बंगळुरू टीमला 115 धावा करता आल्या. खराब फिल्डिंगमुळे बंगळुरूने सामना गमवल्याचं कर्णधार फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं.



संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा.