कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात भारताने अखेरच्या क्षणी बाजी मारत बांगलादेशवर विजय मिळवला. या सामन्यातील खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक. शेवटच्या एका चेंडूत पाच धावांची आवश्यकता असताना त्याने सिक्सर मारत विजयश्री खेचून आणली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळीबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला, मी आज जेथे आहे तेथे खुश आहे. सपोर्ट स्टाफचेही धन्यवाद. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय.


फिनिशरच्या भूमिकेबाबत बोलताना दिनेशने सांगितले, महेंद्रसिंग धोनीचा कूल नेचर मला आवडतो. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याच्या अनुभवातून खूप काही शिकलो. तो ज्याप्रमाणे गेम फिनिश करतो त्यातून खूप काही शिकता आले. यावेळी दिनेशने कोहलीचेही नाव घेतले. 


दिनेशभाईने चांगली कामगिरी केली - वॉशिंग्टन सुंदर


मॅन ऑफ दी सीरिज जिंकणारा वॉशिंग्टन सुंदर म्हणाला, इतक्या कमी वयात हा अॅवॉर्ड मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यासाठी मी माझ्या कुटुंबाचे आभार मानतो.