कार्तिकने जबरदस्त कॅच पकडत गुप्टिलला माघारी धाडले
टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची टीम मैदानात उतरली
नवी दिल्ली : टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची टीम मैदानात उतरली. यावेळी दिनेश कार्तिकने दोन जबरदस्त कॅच घेतल्या आणि न्यूझीलंडच्या बॅट्समनला माघारी धाडले.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
न्यूझीलंडचा तिसरा विकेटही कॅच आऊट झाला आणि ती कॅचही दिनेश कार्तिकने घेतली. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर दिनेश कार्तिकने जबरदस्त कॅच पकडत मार्टिन गुप्टिलला आऊट केलं.
हार्दिक पांड्याने टाकलेला बॉल गुप्टिलने पूल करण्याच प्रयत्न केला. मात्र, टायमिंग चूकला आणि ती कॅच दिनेश कार्तिकने पकडली.
यापूर्वी दिनेश कार्तिकने कोलिन मुनरो याची कॅच पकडत त्याला पेवेलियनमध्ये पाठवलं. तो न्यूझीलंडच्या टीमचा पहिला विकेट होता. जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगवर मुनरोने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागला आणि त्यानंतर तो कार्तिकने पकडत मुनरोला माघारी धाडलं.
कॅप्टन विराट कोहलीने केलेल्या १२१ रन्सच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८१ रन्सचं आव्हान उभं केलं आहे.
या मॅचमध्ये विराट कोहलीने आपली ३१वी वन-डे सेंच्युरी पूर्ण केली. यावेळी दिनेश कार्तिक यानेही विराट कोहलीला चांगली साथ दिली. मात्र, टीम इंडियाचे इतर प्लेअर्स जास्तवेळ मैदानात टिकू शकले नाहीत.