मुंबई : पंजाब, दिल्ली आणि अनेक मोठ्या संघाच्या कर्णधारांची नावे जाहीर झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केलीये.


दिनेश कार्तिक नवा कर्णधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमचे सीईओ वँकी मैसूर यांनी केकेआरच्या कर्णधाराची घोषणा केली. विकेटकीपर दिनेश कार्तिक यंदाच्या हंगामाचा कर्णधार असेल. यासोबतच केकेआर टीम मॅनेजमेंटने रॉबिन उथप्पाची उप-कर्णधार म्हणून निवड केली. 


११व्या सीझनसाठी दिनेश कार्तिकला ७.४० कोटी रुपयांना खरेदी केले. 


यंदाच्या हंगामात केकेआरची संपूर्ण टीम नवी आहे. यंदाच्या हंगामात गौतम गंभीरला रिटेन केलेले नाही. कर्णधारपदाच्या शर्यतीत अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा आणि क्रिस लिन यांचे नाव पुढे आले होते.