मुंबई : कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेजर बंगळूरूचा दारूण पराभव केला. या सामन्यात केनच्या टीमने अवघ्या 68 रन्समध्ये बंगळूरूच्या टीमला माघारी धाडलं. या सामन्यात विराट कोहली फेल झाल्यानंतर दिनेश कार्तिकची बॅट चालेल असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र कोहलीप्रमाणे कार्तिकंही भोपळा न फोडता पव्हेलियनमध्ये परतला. ज्यावेळी कार्तिकची विकेट गेली तेव्हा एक किस्सा घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळूरूची टीम कमकुवत स्थितीत असताना दिनेश कार्तिकच्या खांद्यावर जबाबदारी आली होती. मात्र यावेळी कार्तिकंही फेल ठरला. निकोलस पूरनच्या चपळाईमुळे कार्तिकची विकेट गेली. मुळात ज्या बॉलवर कार्तिकची विकेट गेली तो अंपायरने वाईट बॉल दिला होता. 


झालं असं की, 9 व्या ओव्हरवर जगदीश सूचित गोलंदाजी करत होता. या ओव्हरमध्ये 5 वा बॉल लेग स्टंपवर जात असल्याने अंपायरने तो वाईड दिला. दरम्यान हा बॉल विकेटकीपर पूरनने पकल्यानंतर 2 सेकंदांनी तातडीने अपील केलं. मात्र मैदानावरील अंपायरने याला नॉट आऊट दिलं. 


यावेळी केन विलियम्सननेही जराही वेळ न दडवता रिव्ह्यू घेतला. ज्यावेळी रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा मैदानावरील अंपायरचा निर्णय चुकीचा ठरला. कारण हा बॉल् कार्तिकच्या ग्लोजला लागलेला दिसला. यानंतर कार्तिकला आऊट करार देण्यात आला.


सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 69 रन्सचं आव्हान हैदराबादने 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला.


हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी केली. तर कॅप्टन केन विलियम्सनने नॉट आऊट 16 रन्स केले. तर राहुल त्रिपाठीने सिक्स मारत हैदराबादला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून हर्षल पटेलने एकमेव विकेट घेतली.