दीपा कर्माकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकणार
जिमनॅस्ट दीपा कर्माकरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकावं लागणार आहे.
मुंबई : जिमनॅस्ट दीपा कर्माकरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकावं लागणार आहे.
दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
दुखापतीमुळे दीपाला ऑस्ट्रेलियात होणा-या स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती पुर्णपणे सावरलेली नाही. आणि त्यामुळे रियो ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवणा-या दीपाला आपली जादू दाखवता येणार नाही.
फिटनेसवर घेतेय मेहनत
18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान रंगणा-या एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी ती आपल्या फिटनेसवर मेहनत घेते आहे. दीपानं रियो ऑलिम्पिकमध्ये प्रोडुनोव्हा जम्पमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. यात तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. तिचं ऑलिम्पिक पदक अगदी थोडक्यात हुकलं होतं.