IND vs PAK World Cup 2023 Match Ad Rates: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये यजमान संघाविरोधात एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळत आहे. दरम्यान दुसरीकडे भारतामध्ये डिस्ने स्टारने या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी (ODI World Cup 2023) तयारी सुरु केली आहे. भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण डिस्ने स्टारवरुन केलं जाणार असून इंडियन प्रिमिअर लिगनंतर या स्पर्धेमुळे मोठा फायदा डिस्ने स्टारला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यासाठीचे जाहिरातीचे दर समोर आले असून 10 सेकंदांसाठी मोजावी लागणारी रक्कम ही कॉर्परेट स्तरावरील मॅनेजरच्या वार्षिक पॅकेजपेक्षाही अधिक आहे.


स्पॉनरशीपचे दर किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अनेक जाहिरातदारांनी एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी जाहिरातींच्या हेतूने डिस्ने स्टारशी संपर्क साधला आहे. जाहिरातींचे दर काय असतील याची माहिती एक्सचेंज 4 मिडियाने दिली आहे. या समन्यातील को-प्रेझेण्टर म्हणून जाहिरात करण्यासाठी 118 कोटी रुपये जाहिरातदारांना मोजावे लागणार आहे. तर असोसिएट स्पॉनर्सर होण्यासाठी 88 कोटी मोजावे लागतील. तसेच कोप्रेझेंटिंगसाठीचा दर 150 कोटी रुपये इतका ठेवण्यात आला आहे. तर 'पॉवर्ड बाय'सारख्या स्पॉन्सरशीपसाठी कंपन्यांना 75 कोटी मोजावे लागतील. इतर स्पॉन्सर्सशीपसाठी 40 कोटी खर्च करावा लागणार आहे.


भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 10 सेकंदांसाठी किती पैसे मोजावा लागणार?


वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याकडून डिस्ने स्टारला फार अपेक्षा आहे. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठीचे दरही कंपनीने जाहीर केले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यात 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 30 लाख रुपये जाहिरातदारांना मोजावे लागतील. म्हणजेच एका सेकंदांचा दर हा 3 लाख रुपये इतका असणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी डिस्ने स्टारने इतक्या रक्कमेची मागणी करणं आश्चर्यकारक गोष्ट नाही. भारत-पाकिस्तानमधील पारंपारिक वैर पाहता या सामन्याला मोठी व्ह्यूअरशीप असणार हे उघड आहे. त्यामुळेच या सामन्यांसाठी जाहिरातींचे दर अधिक ठेवण्यात आले आहेत.


दर वाढवले


कंपनीने मागील पर्वाच्या तुलनेत यंदा जाहिरातींचे दर 30 ते 35 टक्क्यांनी वाढवले आहेत. बाजारपेठेची स्थिती पाहून जाहिरातींचे दर वाढवण्यात आले आहेत. एकदिवसीय विश्वचषक सामन्यामधून डिस्ने स्टार कंपनी 1 हजार कोटी कमवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी जाहिरांच्या 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 6 ते 7 लाख रुपये मोजण्यात आले होते. 


सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता


एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं असून पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष आहे. वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. दरम्यान, नियोजित भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो.