Sania Mirza And Shoaib Divorce : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची एक क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी आहे. मात्र आता सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चांणा उधाण आलं आहे. सानियाची एक पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Divorce between Indias Sania Mirza and Shoaib Malik Sanias post viral Latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sania Mirza Shoaib Malik Love Story: पहिल्या भेटीत इग्नोर...पण नंतर असं जडलं प्रेम!


सोशल मीडियावर अलिकडे सानियानं केलेल्या पोस्टवरूवन त्यांच्यातल्या दुराव्याची चर्चा वेगात होतेय. सानियानं अलिकडेच 'वो पल जो मुझे सबसे मुश्किल दिनों से ले आते है', तसंच टुटे हुए दिल कहा जाते हैं', असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमुळे तर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चर्चा रंगताना दिसत आहे. (Sania Mirza insta post viral




 


अभिनेत्रीसोबत नवऱ्याचे स्विमिंगपूलमध्ये बोल्ड आणि हॉट फोटोशूट; तेव्हापासूनच सानिया मिर्झा...


 


काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये शोएबला सानियाच्या टेनिस अकॅडमी बद्दल विचारलं असचा शोएबनं मला काही माहीत नाही असं चकित करणारं उत्तर दिलं होतं. इतकंच नाही तर शोएबनं दोघांचा मुलगा इजहान याच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टवर सानियाची कमेंट मिसिंग आहे. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं बोललं जातंय. सानिया आणि शोएब यांचा 2010 मध्ये हैदराबादमध्ये निकाह झाला होता. मात्र या दुराव्याच्या बातम्यांवर अद्याप दोघांनीही कोणतंही भाष्य केलेलं नाही.