Sania Mirza and Shoaib Malik, नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची(Sania Mirza) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या पर्सनल लाईफमध्ये आलेल्या मोठ्या वादळामुळे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक(Shoaib Malik) यांच्या नात्यात दुरावा आला आहे. विषय अगदी घटस्फोटापर्यंत पोहचल्याचीही चर्चा आहे. मात्र, यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याचे उत्तर शोएब मलिक सोबत फोटोशूट करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरच्या(ayesha.m.omar) जुन्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये(Instagram Post) सापडले आहे.
साधारण वर्षभरापूर्वी शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर सोबत फोटोशूट केले होते. स्विमिंगपूलमध्ये काढण्यात आलेले बोल्ड आणि हॉट फोटो आयेशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.
एका लोकल मॅग्जीनच्या कव्हरपेजसाठी या दोघांनी हे फोटोशूट केले होते. आयेशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेले हे फोटो तुफान व्हायरल झाले होते.
यावेळी नेटकऱ्यांच्या कमेंट्समुळे सानिया हैराण झाली होती. हे असं फोटोशूट सानियाने कसं खपवून घेतले? हे सगळ सानियाला कसं सहन झालं? असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले होते. यामुळे एक दिवस या दोघांचा घटस्फोट होईल अशा कमेंट्स देखील अनेकांनी केल्या होत्या.
यावेळी मिडियामध्ये देखील याची चांगलीच चर्चा झाली होती. शोएबशी लग्न करणार का? असा थेट सवालही आयेशाला विचारण्यात आला होता. मात्र, आयेशाने नकार देत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. दहा बारा वर्षाच्या सुखी संसारानंतर सानिया आणि शोएब विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे.