मुंबई : आयपीएलचा बिझनेस प्लान दमदार आहे, खरंतर बिझनेस प्लान नुसार प्रायव्हेट कंपन्यांना फ्रेंचाइजी खरेदी करण्यासाठी आमंत्रण दिलं जातं, क्रिकेट टीमसाठी फ्रेंचाइजी मोठी गुंतवणूक करते, त्याला आपण टीमची खरेदी किंवा मालकी घेणे असे म्हणतो.


टीमला कोट्यवधींच्या जाहिराती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेचाईजीनंतर कॉर्पोरेटस जगतालाही क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केलं जातं, तमाम दिग्गज कंपन्यांना फक्त को-ओनरशीप दिली जाते, पण कॉर्पोरेटसकडून टीमला कोट्यवधींच्या जाहिरातींची ऑफरही होते. या मार्गानेच आयपीएलची ब्रॅण्ड व्हॅल्यू तयार होते.


आयपीएल म्हणजे फक्त व्यवसाय


आयपीएलला क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये पाहिलं जातं, पण वास्तव असं आहे की, आयपीएल बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आलं, फ्रेंचाइजीने देखील आयपीएलकडे फक्त व्यवसाय म्हणूनच पाहिलं.


आक्रमकपणे बिझनेस


कंपन्यांनी आक्रमकपणे बिझनेस केला, जाहिराती केल्या. मागील वर्षी जिओ लॉन्च झाल्यानंतर जिओने कोट्यवधी रूपयांची स्पॉन्सरशीप देऊन, जाहिरात जगताला हलवून सोडलं.


आयपीएलची सुरूवात अशी झाली


बिझनेस, मनोरंजन आणि स्पोर्टसला एका प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलं, याचं श्रेय अर्थात दिलं जातं ते ललीत मोदी यांना. ललीत मोदी यांनी आयपीएलला क्रिकेटशी जोडून कोट्यवधी रूपयांचा खेळ सुरू केला, या खेळाची सुरूवात २००७ मध्ये झाली होती, तेव्हा अनेकांना वाटलं नव्हतं की हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म होईल.