IPLवर वर्चस्व असणारी `ही` पाच कुटुंब तूम्हाला माहितीयत का ? जाणून घ्या...
आयपीएल (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अवघ्या काही दिवसातंच 15 व्या हंगामाचा विजेता ठरणार आहे.तत्पुर्वी आयपीएलवर वर्चस्व असणाऱ्या 5 कुटुंबातील जोडप्यांची माहिती देणार आहोत. नेमके हे 5 कुटुंब कोण आहेत, ते या बातमीत जाणून घेऊयात.
मुंबई : आयपीएल (IPL 2022) सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. अवघ्या काही दिवसातंच 15 व्या हंगामाचा विजेता ठरणार आहे.तत्पुर्वी आयपीएलवर वर्चस्व असणाऱ्या 5 कुटुंबातील जोडप्यांची माहिती देणार आहोत. नेमके हे 5 कुटुंब कोण आहेत, ते या बातमीत जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर
या दोघांच्या जोडीबद्दल तर तुम्हाला माहितचं असेल. सचिन (Sachin Tendulkar)हा मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians)मार्गदर्शक आहे तर त्याचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. या दोघा बाप-मुलाची जोडी मुंबईच्या ताफ्यात आहे.
मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे, तर निव्वळ एक-दोन सामनेच उरले आहेत. त्यामुळे आता अर्जुनला या सामन्यात तरी संधी मिळणार का ? हे पहावे लागेल.
पंड्या ब्रदर्स
हार्दिक पंड्या (Hardik Pandya)आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) हे सख्खे भाऊ असून दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. गेल्या मोसमात हे दोघेही मुंबईकडून खेळायचे, मात्र आता हे वेगवेगळ्या संघाकडून खेळतात.
हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार आहे, तर कुणाल लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow super giants)खेळाडू आहे. दोघेही सध्या चांगली कामगिरी करत आहेत.
अनमोलप्रीत सिंग आणि प्रभसिमरन सिंग
पटियालाचे असलेले अनमोल (Anmolpreet singh) आणि प्रभसिमरन (prabhsimran) चुलत भाऊ आहेत. अनमोलचे वडील सतविंदर सिंग हे हँडबॉल खेळाडू असून त्यांनी एकेकाळी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
विशेष म्हणजे सतविंदर सिंगला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नव्हता आणि त्याचा मुलगा आणि पुतण्याने क्रिकेटपटू व्हावे अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. मात्र दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट हेच क्षेत्र निवडले. अनमोलप्रीत हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे तर प्रभासिमरन हा पंजाब किंग्जचा खेळाडू आहे.
या दोन्ही क्रिकेटपटूंनी या मोसमात एक-दोन सामनेचं खेळले आहेत. मात्र, त्यांना आपली छाप सोडता आली नाहीय.
मार्को जॅन्सन आणि डुआन जॅन्सेन
दक्षिण आफ्रिकेचे मार्को जॅन्सन (Marco Jansen)आणि डुआन जॅन्सेन (Duan jansen)हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मार्को हा सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू आहे तर दुआने हा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मार्कोने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर त्याचा जुळा भाऊ देखील एक चांगला गोलंदाज आहे.
मायकेल हसी आणि डेव्हिड हसी
मायकेल हसी (michael hussey) आणि डेव्हिड हसी (david hussey) हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मायकेल चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक आहे तर डेव्हिड कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आहे.
दोघे हसी ब्रदर्स आपापल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.