MI vs KKR : मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची `चालाख खेळी`
MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवलं. त्यामुळे गोलंदाजी करताना आता पांड्याला रोहितच्या (Rohit Sharma) मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आयपीएलचा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या आहेत. सामना जरी वानखेडे (Wankhede) असला तरी मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. त्याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय... याच निर्णयामुळे आता मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याचं दिसून येत आहे. हा निर्णय होता प्लेइंग इलेव्हनमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) बाहेर ठेवण्याचा..
होय, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला अन् रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून (Rohit Sharma Not In Playing XI) बाहेर ठेवण्यात आलं. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सलामीला मैदानात आला. नुवान तुषारा याच्या जागी रोहित शर्मा 12 वा खेळाडू म्हणून मैदानात आल्याने हार्दिक पांड्या सध्या ट्रोल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर टीका होत आहे. हार्दिक पांड्याला आता कॅप्टन्सीसाठी रोहित शर्माच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सोशल मीडियावर सवाल विचारला जातोय.
हार्दिक पांड्याकडे कॅप्टन्सी आल्यानंतर रोहित शर्मा पांड्याला मदत करताना दिसत होता. याच काळात पांड्यावर ट्रोलिंग झाली. रोहितने पांड्याला दिलेल्या काही निर्णयाचं फॅन्सने स्वागत देखील केलं होतं. त्यामुळे रोहित शर्मावर सर्वांची नजर असायची. आता फिल्डिंग करताना रोहित शर्मा मैदानात न दिसल्याने वानखेडेवर नाराजी दिसत होती. तर सोशल मीडियावर हार्दिकने मुद्दामहून रोहितला बाहेर बसवलं, अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही अलबेल आहे का? असा प्रश्न देखील सध्या विचारला जात आहे.
दरम्यान, आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी हार्दिकने चालाख खेळी केल्याचं देखील बोललं जातंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने रोहित शर्मा जखमी होऊ नये म्हणून त्याला फक्त फलंदाजीसाठी पाठवलं जातं आहे, असं देखील बोललं जात आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी , पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.